Sunday 20 January 2013

जग

या जगात कोणावरही अवलंबुन राहु नका..
 अगदी तुमच्या सावलीवरही... 
कारण तीदेखील अंधारात तुम्हाला सोडुन जात असते..
 स्वावलंबी रहा..
 कारण सगळ्यांमध्येच थोडाफार तरी स्वार्थीपणा हा असतोच...!!

आयुष्य

निर्णय चुकतात आयुष्यातले आणि मग आयुष्यच चुकत जाते ..

प्रश्न कळत नाही कधी कधी आणि उत्तरही चुकत जाते ..

सोडवताना वाटते , सुटत गेला गुंता ..
...
पण प्रत्येक वेळी 1 नवीन गाठ बनत जाते ..

दाखवणाऱ्याला वाट माहित नसते ..

चालणाऱ्याचे ध्येय मात्र हरवून जाते ..

वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी ..

"अनुभव"म्हणजे काय हे तेव्हाच कळते ...!!

जेव्हा एखादी"ठेच"काळजा ला लागते

Wednesday 16 January 2013

रंग माझा वेगळा!

रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!

कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा!


राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी;
हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा!

कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो
अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा ?

सांगती 'तात्पर्य' माझे सारख्या खोट्या दिशा :
'चालणार पांगळा अन् पाहणारा आंधळा !'

माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी :
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !

धुंद होते शब्द सारे

धुंद होते शब्द सारे.. धुंद होत्या भावना..
वार्यासंगे वहाता त्या फुलापाशी थांब ना..

Monday 14 January 2013

साथ देणारे

मी तुझ्यासाठी जीव देईल
असे म्हणणारे खूप जण असतात
.
पण
.
जीवाला जीव लावून आयुष्यभर साथ देणारे मात्र
खूप कमी भेटतात ।।

प्रेम हे जिवनासाठी आहे...

प्रेम हे जिवनासाठी आहे...
पण जीवन हे प्रेमासाठी नाही...!!
प्रेम हे जीवनात असू शकते पण जीवन हे
प्रेमात असू शकत नाही...
प्रेमात जीवन वाया घालवु नका पण
जीवनात प्रेम करायला विसरु नका...

तिळ गूळ घ्या गोड गोड बोला

एवढासा तीळ त्याला महत्व केवढ,
त्यात लपलंय प्रेम आभाळा एवढ,
तिल्वर फुलतो हलव्याचा काटा,
प्रेमाने भेट आणि तिळगुळ वाटा

तिळ गूळ घ्या गोड गोड बोला ........

चुका

आयुष्यात वाईट तेव्हावाटते ...
जेव्हा आपण काही चुका करतो...
पण सर्वात जास्त वाईट
तेव्हा वाटते जेव्हा ..
त्या हजार चुका आपण
एका चुकीच्या व्यक्तीसाठी करतो...!!